Friday, July 23, 2010

मावसबोलीतल्या कविता

खो दिल्याबद्दल गायत्रीचे अनेक आभार.

इल बार्बिएर दि सेव्हिलिया (सेव्हिलियाचा न्हावी) ज्योकिनो रोस्सीनी यांचा १७७५ सालातील विनोदी ऑपेरा आहे. रोस्सीनी यांनी हा ऑपेरा केवळ १३ दिवसात लिहीला.

त्यातील न्हाव्याच्या प्रवेशाचे 'लार्गो अल फाक्तोतम' हे गाणे आहे. मिसेस डाउटफायर, ऑस्कर अशा बर्‍याच चित्रपटांमध्ये हे गाणे वापरले आहे. गाण्याचा प्रकार आरिआ आहे. गाण्यातील स्वरांच्या जलद चढउतरांमुळे हा आरिआ गायला अत्यंत अवघड मानला जातो.

Largo al factotum della città!
Presto a bottega che l'alba e già!
Ah, che bel vivere, che bel piacere
per un barbiere di qualità!

Ah, bravo Figaro!
Bravo, bravissimo!
Fortunatissimo per verità!
Pronto a far tutto, la notte e il giorno,
sempre d'intorno in giro sta.
Miglior cuccagna per un barbiere,
vita pi nobile, no, non si dà.

Rasori e pettini,
lancette e forbici,
al mio comando
tutto qui sta.
V'e la risorsa, poi, de mestiere
colla donnetta... col cavaliere...
colla donnetta...
col cavaliere...
Ah, che bel vivere, che bel piacere
per un barbiere di qualità!

Tutti mi chiedono, tutti mi vogliono,
donne, ragazzi,
vecchi, fanciulle:
Qua la parruca... Presto la barba...
Qua la sanguigna... Presto il biglietto...

Figaro... Figaro... Figaro... Figaro... Figaro!
Ahime, che furia!
Ahime, che folla!
Uno alla volta, per carita!

Figaro! Son qua.
Ehi, Figaro! Son qua.
Figaro qua, Figaro là,
Figaro su, Figaro giù.
Pronto prontissimo son come il fulmine,
sono il factotum della città!
Ah, bravo Figaro!
Bravo, bravissimo;
a te fortuna non mancherà.

~

वाट द्या, वाट द्या
शहराचा न्हावी चाललाय, दुकान उघडायला
उजाडतय, उशीर झालाय
किती सुंदर आयुष्य, काय तो आनंद
जर तुमच्या बोटात असेल कौशल्य
केसांना हवे तसे वळवण्याचे

शाब्बास, फिगारो!
तुझ्यासारखा नशीबवान तूच

कोणत्याही कामाला तयार
दिवस असो की रात्र
पायाला सतत भिंगरी लागलेली
एका न्हाव्यासाठी
याहून चांगले आयुष्य
कुठे मिळणार?

वस्तरे आणि कंगवे
चिमटे आणि कात्र्या
सगळे माझ्या दिमतीला
सगळे आहेत हजर
माझ्या कामाची हत्यारे
बाईसाहेबांसाठी ... रावसाहेबांसाठी

सगळे मला शोधतात
सर्वांनी मीच हवा
स्त्रिया, मुले, म्हातारे-कोतारे, तरूण मुली
हा तुमचा विग, दाढी करून झाली
बारीकसे कापले, रक्त आले
बिल तयार आहे

फिगारो! फिगारो! फिगारो! फिगारो! फिगारो!
काय हा गोंधळ
काय ही गर्दी
रांगेत या, एकावेळी एकच
ए, फिगारो! मी इथे आहे
फिगारो इथे, फिगारो तिथे
फिगारो वर, फिगारो खाली

वेगात, आणखी वेगात, मी आहे विजेसारखा वेगवान
मी आहे या शहराचा नोकर
शाब्बास फिगारो!
तुला नशिबाची कमी नाही

~

माझा खो सई ला.


8 comments:

Mandar Gadre said...

wow!
just today, KDFC here played the overture for this opera. utterly beautiful :)

Raj said...

Cool. Must have been great :)
I would love to see the opera.

Saee said...

Muddam comment keli nhavti. Karan mala aria, ani tuzi kavita ekatra vaikaychi/wachaychi hoti.

I don't know if I am right, but this poem exudes the innocence of a barber's busy life. :D
And I like the way how he says that he is the luckiest man in the world!!
Talk about job satisfaction!! :)
I loved the aria.

Hmm. Ata mala pan nhavi vhavasa wattay. :D
Ani Australian mulinche kes baghta mala kahi qualification pan lagnar nahi. Uchalli katri lavli (dusryachya) talkyala. :D

Raj said...

I am not sure of the context of this aria with respect to the whole opera. Yes, it does exude innocence. Perhaps thats why it has been used in so many films.

I think all women are born hairdressers :)
I am sure you would do well there.
You already learn "Baal ki khal nikalana" during your PhD. The rest is easy, peasy, japanesey :D

Yawning Dog said...

bhaaree zalay bhashantar.
Figaro navach khatara ahe, al pacino italian nhavyachya veshat dolyasamor ala :D

Shraddha Bhowad said...

हो, मी ’Mrs. Doubtfire’ मध्ये ऐकलंय हे गाणं. रॉबिन विल्यम्स पोपटाचा आवाज डब करताना म्हणत असतो.
भाषा कुठलीये हे लिहिलं नाहीयेस. रॉस्सिनी इटालियन एव्हढं माहितेय. मग इटालियनच असावी अशी समजूत घातली. कारण गुगल मारला तर proudly lebanese असं काय काय आलं. इटालियन आणि लेबॅनीज..झेपलंच नाही..मग मी नादच सोडला.
अनुवाद चांगलाच आहे. आणि तो कळल्यानंतर ते गाणं व्हिजुयली अधिक चांगलं वाटतंय.
मी अगदी ’कर्तनकेसरी’ नाही. पण तू ’उस्तरा’ वापरलयंस. तिथे ’वस्तरा’ हवं होतं नाही?

Raj said...

यॉडॉ
पचिनो फिगारो. मस्तच. माझ्या हे डोक्यात आले नव्हते :)

श्रद्धा
स्वारी लिहायला विसरलो. भाषा इटालियनच आहे.
गूगलून सापडले नाही याचे नवल वाटले.
largo al factotum सर्च केल्यावर बरीच पाने मिळतात.
https://encrypted.google.com/search?client=ubuntu&channel=fs&q=largo+al+factotum&ie=utf-8&oe=utf-8


वस्तरा हवा. चूक सुधारल्याबद्दल आभार.
माझ्या डोक्यात उस्तरा का जाऊन बसले होते कळत नाही. :)

भानस said...

राज, अनुवाद आवडला. थोडा हटकेच प्रकार असल्याने अजूनच मजा आली. :)