Sunday, January 11, 2009

स्ट्रेंजर दॅन फिक्शन

कुठलाही चित्रपट बघताना आपल्या डोक्यात एक रूपरेखा तयार होत असते. चित्रपटाची जातकुळी पाहून आपण पुढे काय होणार त्याचे अंदाज बांधत असतो. ऍक्शन असेल तर ९९% वेळा शेवटी गुंडांचा (किंवा गुंडिणींचा! आजकाल स्त्रियांना समान हक्क आहेत.) खात्मा होऊन हिरो-हिरुनी शेवटी एकत्र यनार म्हंजे यनार. आन लव ष्टोरी असेल तर आजकाल थोडे बदल झाले आहेत (त्रिकोणाऐवजी चौकोन, षटकोन वगैरे). हिंदी चित्रपट असेल तर तेवढाही विचार करावा लागत नाही.

'स्ट्रेंजर दॅन फिक्शन' ची खासियत ही की हा कुठल्याच जातकुळीत बसत नाही. कारण इथे पुढे काय होणार हे लेखिकेलाच माहित नाही. कॅरेन आयफेल (एम्मा थॉम्पसन) एक प्रथितयश लेखिका आहे. पण चित्रपट सुरू होतो तेव्हा तिला 'रायटर्स ब्लॉक' आला आहे. तिच्या कादंबरीतील मुख्य पात्र मरणार आहे पण त्याला कसे मारायचे हे तिला सुचत नाहीये. अडचण ही की हे मुख्य पात्र, म्हणजेच हॅरॉल्ड क्रिक (विल फेरॉल), यालाही खर्या जगात अस्तित्व आहे. आणि जसजशी कॅरेन कादंबरी लिहीत जाते, तसतसे त्याला ती वाक्ये ऐकू येतात. यातूनच त्याला कळते की आपण लवकरच मरणार आहोत. मग तो मदतीसाठी जातो साहित्याचे प्राध्यापक हिल्बर्ट (डस्टीन हॉफमन) यांच्याकडे. हिल्बर्ट त्याचे आयुष्य (पक्षी ही कादंबरी) ट्रॅजेडी आहे की कॉमेडी हे शोधण्याचा प्रयत्न करतात. आशा ही की त्यावरून लेखिका कोण आहे त्याचा पत्ता लागावा. पुढे काय होते ते पडद्यावर बघण्यातच मजा आहे.

हा चित्रपट कितीतरी पातळ्यांवर मनाला भिडतो. कलाकृती श्रेष्ठ होण्यासाठी ती ट्रॅजेडीच असावी लागते का? नायकाने शेवटी मरायलाच हवे का? आणि जर खरे आयुष्य आणि कादंबरी एक असले तर आयुष्य सुखाने जगायचे की कादंबरीला श्रेष्ठ करायचे? इथे टॉलस्टॉयचे वाक्य आठवते. "Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way." चित्रपटात एकदा हिल्बर्ट हॅरॉल्डला सांगतात, "तुझे काय होणार हे तुझ्या हातात नाही." "मग मी काय करू?" " तुला आत्तापर्यंत जे सर्व करायचे होते ते कर. आयुष्याचा मनमुराद आनंद लुट." इथे मुळाशी असलेला प्रश्न गहन आहे. आपले आयुष्य कितपत आपल्या हातात असते? फ्री विल ही संकल्पना कितपत खरी आहे?

चित्रपटाच्या सुरूवातीला एम्मा थॉम्पसनचा आवाज ऐकला आणि जीव भांड्यात पडला. तिचे चित्रपट क्वचितच निराशा करतात कारण ती डोके शाबूत ठेवून भूमिका निवडते. तिला डस्टीन हॉफमनबरोबर एकच प्रसंग आहे पण दोघे एकमेकांना पुरून उरतात. विल फेरॉल तितका भावला नाही पण मॅगी ग्निनहॉल इतकी गोड दिसते की तिच्या प्रेमात पडावेसे वाटते.

रंगमंचावर अभिनय करताना आपल्या भुमिकेत कधी रहायचे आणि कधी बाहेर पडायचे याबद्दल प्रत्येक अभिनेत्याचे वेगवेगळे नियम असतात. साहित्य आणि खरे जग यांच्यातील या अदृश्य पडद्याला रंगभूमीवर बरेचदा 'फोर्थ वॉल' म्हणुन ओळखले जाते. या चित्रपटात ही चौथी भिंत नष्ट झाली आहे.



6 comments:

Monsieur K said...

seems like an interesting movie.. baghitlaa paahije! :)

Saee said...

Ooh. Sounds like something exciting. I am in!! =)
Cheers

Raj said...

@Monsieur K, Saee
Thanks alot! yes, you should not miss this movie!

Anonymous said...

Hi, visit to http://www.quillpad.in to type in your mother tongue. it is nothing but just type the way you speak. No rules,keymappings.it is user friendly. you can ease your work by using Quillpad. try this and you will sure enjoy.

It supports English word and gives multiple options for each word. It is as easy as writing your name in English.

Expressing views in his/her own mother tongue is great experience. By using ‘Quillpad’ you can ease your work. Enjoy….

Saee said...

New post!! New post!! New post!!
I am eagerly waiting to read something hilarious and Marathi at the same time. :D
So tell me if you need a bride..

Saee said...

Oooops..I meant bribe.
Gosh this is an alarming sign. If I am programmed to type a "D" after a "bri" something has to be done about it!! :D
Cheers